मोठी बातमी ! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

0 झुंजार झेप न्युज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई,दि.04: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची दापोली, रत्नागिरी येथील 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली आहे. अवैध बांधकाम केलेल्या साई रिसॉर्ट, आणि मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे.ईडीने जप्त केलेल्या जमिनीची किंमत 2,73,91,000 रुपये आहे. तर ज्या जागेवर साई रिसॉर्ट एनएक्स बांधले गेले आहे. त्याची किंमत 7,46,47,000 रुपये आहे. साई रिसॉर्ट बेकायदा बांधकामाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल परब परिवहन आणि संसदीय कामकाज मंत्री होते. मनी लाँड्रिंग आणि बेकायदा साई रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप परब यांच्यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान, सोमय्या यांनी परब यांच्यावर दापोलीत बेकायदा हॉटेल बांधल्याच्या आरोपावर ठाम होते. हे बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या यांनी दापोलीत जाऊन आंदोलनही केले होते. तर परिवहन विभागात बदलीचे रॅकेट चालवल्याचा आरोपही सोमय्या यांनी परब यांच्यावर केला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.