विहमांडवा येथे शांतता समितीची बैठक संपन्न
विहामांडवा,दि.17: (किशोर धायकर पैठण प्रतिनीधी); पैठण तालुक्यातील विहामांडवा-येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे त्या निमित्त औरंगाबाद ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया यांच्या आदेशानुसार पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी विहामांडवा गावातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक सुशांत सुतळे, यांनी मार्गदर्शन केले.
सण वार, उत्सव किंवा जयंती काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास गय केली जाणार नाही, पाचोड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावावर पोलीसांचे लक्ष असुन नागरीकांनी कायद्याच्या चौकटीत राहुन उत्सव साजरे करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला. शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर विहामांडवा येथील ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपसरपंच मुकेश काला,मा सरपंच अफसरभाई शेख, ग्रा सदस्य विनोद निंबाळकर, सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य व पञकार बांधव आदींसह उपस्थिती होती.

