राहुल कलाटे यांनी कुटुबियांसह बजाविला मतदानाचा हक्क
पिंपरी चिंचवड,दि.26: चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कुटुबियांसह वाकड येथील माऊंट लिटेरा शाळेतील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्यासोबत आई कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.चिंचवडचे भवितव्य ठरवत असताना माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आपले प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याची लोकांची मानसिकता आहे. मला प्रचारादरम्यान जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. लढत एकतर्फी झाली. माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया राहुल कलाटे यांनी मतदानानंतर दिली.

