मतदारांचा भाजपवर विश्वास, विजय माझाच होणार – अश्विनी लक्ष्मण जगताप

0 झुंजार झेप न्युज

(पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाबद्दल प्रतिक्रिया)

पिंपरी चिंचवड,दि.26: चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी चांगले मतदान झाले आहे. मतदारसंघातील मतदारांनी घराबाहेर पडून केलेल्या मतदानाबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाला मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये पहिल्यापासून प्रचंड उत्साह होता. मतदान संपेपर्यंत हा उत्साह कायम राहिला. मतदारांनी मतदानातून दाखवलेला उत्साह भाजपला बळ देणारा आहे. ज्यादिवशी भाजपने मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, त्याचदिवशी माझा विजय निश्चित झाला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सामान्य मतदारांचा भाजपवर विश्वास आहे की हाच पक्ष देशाला जगातील महासत्ता बनवू शकतो. चिंचवड मतदारसंघातील मतदार सुद्धा भाजपवर विश्वास व्यक्त करणारा आहे. येत्या २ मार्च रोजी मतमोजणीतून मतदारांचा भाजपवरील विश्वास आणखी दृढ झालेला असेल. निवडणुकीत माझा विजय होणार याची मला खात्री आहे.    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.