तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार!

0 झुंजार झेप न्युज

- महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना सूचना

- तलावांचे खोलीकरण, सुशोभिकरण करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड,दि.01: पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक तलावांचे खोलीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा. त्याद्वारे पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्त्रोतांचे जतन करावे, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वाढत्या नागरीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य असलेल्या तलावांची दुरावस्था झाली आहे. सर्वच तलावांमध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचला असून, गवत आणि जलपर्णीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी कचरा फेकण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्यस्थितीला शहरात प्राधिकरण येथील गणेश तलाव, चिखली, भोसरी आणि बर्ड व्हॅली येथील तलावाची अवस्था दयनीय आहे. गेल्या काही वर्षांपासून या तलावांमधील गाळ काढण्यात आलेला नाही. तलावांमध्ये प्रशासनाकडून नियमित स्वच्छता केली जात नाही. अस्वच्छतेमुळे तलावातील पाण्याचे प्रदूषण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. यामुळे प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.

तलाव सुधार प्रकल्प हाती घ्यावा : लांडगे

शहरातील तलाव हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. त्याकरिता तलावांमधील गाळ काढून खोलीकरण करावे. त्याद्वारे तलावांचे पुनरुज्जीवन करुन सुशोभीकरण करावे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या ठिकाणी मोकळा श्वास घेता येईल. पर्यावरण संधर्वन आणि नैसर्गिक जलस्त्रोत पुनरुज्जीवन करतानाच शहराच्या सौंदर्यात भर घालल्याच्या हेतूने तलाव सुधार प्रकल्प हाती घेणे संयुक्तिक ठरणार आहे. यावर सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करावी, अशी सूचनाही आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.