डॉ.डी.वाय पाटील रात्र महाविद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिनाचे आयोजन.

0 झुंजार झेप न्युज

डॉ.डी.वाय पाटील रात्र महाविद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिनाचे आयोजन.

पिंपरी चिंचवड : डॉ.डी.वाय पाटील कला वाणिज्य रात्र महाविद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.डी. पाटील सर, विश्वस्त डॉ.सोमनाथ पाटील सर आणि कार्यकारी संचालक डॉ.अविनाश ठाकूर सर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रणजित पाटील सर हे होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ.जीवन शिंदे सरांनी रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य विकासासाठी महिंद्रा ऑटोमॅटिक कंपनीच्या सी.एस.आर च्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शॉर्ट टर्म कोर्सबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तर अध्यक्ष मनोगता मध्ये डॉ.रणजित पाटील सर यांनी रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगून महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली गुणवत्ता विकसित करावी असे मत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे आभार मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.पंकज शिंगोटे सर यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. रणजित कदम सर यांनी केले या कार्यक्रमासाठी रात्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्त कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.