बार्टी फेलोशिप धरणे आंदोलन
मुंबई: बार्टी फेलोशिप धरणे आंदोलन, आझाद मैदान मुंबई, दि. 20 फेब्रुवारी 2023 पासून आज दि.8 मार्च २०२३ जवळपास 17 दिवस हे धरणे आंदोलन चालू आहे.परंतु सरकार अजूनही धोरणात्मक निर्णय जाहीर करत नाही. फक्त तोंडी आश्वासन देत आहे, समाज कल्याण विभागाचे मंत्रालयीन सचिव भांगे असं म्हणतायेत की, तुम्ही आता धरणे आंदोलन थांबवा सरकार तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहे,सकारात्मक आहे परंतु आम्हाला जोपर्यंत महाराष्ट्रातील एस सी कॅटेगिरीतील पीएचडी 861 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी असा नलिखित रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन थांबवणार नाहीत.
आज उत्तमराव गायकवाड समाजभूषण आमच्या भेटीला रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निरीक्षक विक्रम खरे साहेबांनी भेट दिली त्यांच्यासोबत मधुकर गवई सर महासचिव महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन, सुभाष बर्वे नागपूर,रिपब्लिकन सेना मुंब्रा कलवा विधानसभा अध्यक्ष राजु दादा दोंदे साहेब पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मुंब्रा शहर अध्यक्ष प्रणय दादा घोरपडे आणि त्यांच्या इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट दिली.

