पिंपरी-चिंचवडमध्ये "H3N2" चे संकट रोखण्यासाठी प्रशासन 'सतर्क'!

0 झुंजार झेप न्युज

- आमदार महेश लांडगे- आयुक्त शेखर सिंह यांची बैठक

- शहरातील आरोग्य यंत्रणेनेबाबत केल्या सूचना

पिंपरी चिंचवड,दि.16: पिंपरी-चिंचवडमधील H3N2 च्या संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सतर्क करा. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होता कामा नये, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत. शहरात H3N2 च्या संसर्गामुळे वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला, असे वृत्त कळल्यानंतर आमदार लांडगे मुंबई येथील अधिवेशनातून तातडीने शहरात दाखल झाले. त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याचीशी सायंकाळी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफने, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयाचे 'डीन' डॉ. राजेंद्र वाबळे उपस्थित होते. 

सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफने म्हणाले की, H3N2 चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या. शहरातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये यासाठी १० बेड राखीव ठेवावेत. ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाने सर्वोत्तम आरोग्य सुविधा द्यावी. तसेच, संबंधित रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला? याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

'त्या' रुग्णाचा मृत्यू एकाच वेळी अनेक आजारामुळे! 

H3N2 चा संसर्ग झाल्यामुळे एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, संबंधित वृद्ध नागरिक यांचे वयोमान आणि एकाचवेळी अनेक व्याधी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत अहवाल आल्यानंतर सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. पण, भयभीत होऊ नये, असे आवाहन डॉ. गोफने यांनी केले आहे.

महापालिका प्रशासनाचे आवाहन…

H3N2 संसर्गाबाबत महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार तयारी केली आहे. प्रत्येक रुग्णालयात राखीव बेड आहेत. प्रसंगी एक रुग्णालय पूर्ण याच उपचारासाठी उपलब्ध केले जाईल. कोविड सारखी परिस्थिती होणार नाही. रुग्ण संख्या वाढल्यास वायसीएमसुद्धा H3N2 च्या उपचारासाठी खुले करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.