एसटी क्वॉर्टर नांदेड येथे भीम जयंती उत्साहात साजरी
नांदेड,दि.15: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी कर्मचारी निवासस्थान (एसटी क्वॉर्टर) वर्कशॉपजवळ नांदेड येथे संविधान निर्माते, भारतरत्न, क्रांतीसूर्य, बोधीसत्व, ज्ञानाचा अथांग सागर, महामानव, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती एसटी कर्मचारी निवासस्थानातील कुटुंबियांच्यावतीने मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गायकवाड हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून आम्रपाली शेळकीकर, शरीरसौष्ठव पहेलवान अभिषेक ताकझुरे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, शिवाजी निरडे, भगवान दुधारे, संजय दुधमल, बालाजी राक्षसे, यशोदीप आटकोरे, किरण कारामुंगे, सोनाजी खिराडे, गौतम सावंत, सौ. आम्रपाली जमदाडे, माया थोरात, गंगासागर जोंधळे, वर्षा हनवते, शेषेराव सरोदे, रोहित मिसलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम पंचशीलाचे ध्वजारोहण करण्यात येऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आम्रपाली शेळकीकर, अभिषेक ताकझुरे, गुणवंत एच. मिसलवाड यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप संजय गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय दुधमल यांनी केले तर आभार आम्रपाली जमदाडे यांनी मानले. यावेळी एसटी कर्मचारी निवासस्थानातील सर्व कुटुंब मुलाबाळांसहीत उपस्थित होते.

