कोरोना संदर्भात नागरिकांनी घाबरुन जावू नये - पालकमंत्री शंभूराज देसाई

0 झुंजार झेप न्युज

कोरोना संदर्भात नागरिकांनी घाबरुन जावू नये - पालकमंत्री शंभूराज देसाई   

सातारा : जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जावू नये. शासकीय आरोग्य यंत्रणा औषधसाठयासह संपूर्णपणे सज्ज असून लक्षणे आढळल्यास स्वत: पुढे येवून कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संदर्भात आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासकीय रुग्णालये, प्राथमिक रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण यंत्रणा उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रणांसह सज्ज आहे. तसेच उपचारासाठी लागणारा औषधसाठाही उपलब्ध आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना तोंडवर मास्क लावावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री.देसाई यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.