महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी..

0 झुंजार झेप न्युज

महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी..

पिंपरी चिंचवड,दि.28: महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे,प्रशासन अधिकारी नंदकुमार येनपूरे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी उपस्थित होते.

विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. त्यांनी देशासाठी अनेक वर्षे तुरुंगवास देखील भोगला होता.स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.