राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन व स्वागत

0 झुंजार झेप न्युज

 राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन व स्वागत

अकोला,दि.10: राज्यपाल रमेश बैस यांचे आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाप्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पुप्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदिप घुगे,उपविभागीय अधिकारी शरद जावळे, रामेश्वर पुरी, मंडल रेल प्रबंधक धीरेंद्रसिंह, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री. बैस यांच्या आगमनानंतर पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमाकरिता रवाना झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.