राज्यातील अँट्रॉसिटी प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार - प्रमोद क्षिरसागर
पिंपरी चिंचवड,(गौतम मोरे पिंपरी चिंचवड प्रतिनिधि)दि.15: निगडी (प्राधिकरण) येथील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते येत्या शुक्रवार दिनांक १६ जून रोजी होणार असल्याची माहिती एकंदरीत प्राप्त झाली आहे.महाराष्ट्र लागोपाठ दलित अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. नांदेड बोंढार हवेली याठिकाणी जातीय मानसिकतेतून भीम जयंती साजरी केल्याच्या रागातून अक्षय भालेराव या युवकाची निर्घृणपणे हत्या केली.
त्यानंतर लातूर मधील मातंग समाजातील गिरधारी तपघाले यांची हत्या केली गेली या सर्व घटना समोर येत असताना मुंबई मधील माता सावित्रीमाई फुले वसतीगृहात हिना मेश्राम या युवतीची बलात्कार करून हत्या झाल्याची घटना समोर आली. लागोपाठ राज्यात जातीय मानसिकतेतून दलितांच्या कत्तली केल्या जास्त असताना मुख्यमंत्र्यांनी त्यावर साधी टिप्पणी किंवा निषेध ही नोंदवला नाही. त्यामुळे राज्यात जातीय मानसिकतेतून घडत असलेल्या हत्येचे प्रकार व त्यातून होत असलेले सामाजिक ध्रुवीकरण यासर्व बाबींकडे महात्मा बसवेश्वर पुतळा अनावर प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती लढा यूथ मूव्हमेंट चे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी दिली.

