कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम

0 झुंजार झेप न्युज

कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम

पुणे, दि.23: कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत फेजाने मदिना मस्जिद, साईबाबा नगर, कोंढवा खुर्द, पुणे या ठिकाणी कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात मदरसा मधील मुलांना धूम्रपान व कुठलेही प्रकारचे व्यसन करू नये ते केल्यास शरीरास किती धोका आहे याबाबत सांगण्यात आले. तसेच आपण आपल्या घरातील लोकांना तसेच मित्रमंडळी यांना व्यसनाधीन न होता व्यसनमुक्ती कडे वळवण्याचा प्रयत्न करावा असे सांगावे. सदर कार्यक्रमासाठी मौलाना सुफी अन्वर व त्यांच्या मदरसा मधील 35 ते 40 मुलं, पोलीस स्टेशन कडे गोपनीय व एटीसी स्टाफ असे उपस्थित होते. सदर कार्यक्रम सायंकाळी 20/15 वाजता सुरू होऊन 21/00 वाजता शांततेत पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.