शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीची उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

0 झुंजार झेप न्युज

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीची उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर,दि.13: तपोवन मैदानावर 13 जून रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. व या कार्यक्रमासाठी येणाऱ्या एका ही लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये याबाबत प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती घेतली व कार्यक्रम झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.यावेळी खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.पी. कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील व अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला सर्व विहित केलेल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. पाणी आरोग्य जेवण याबरोबरच मोबाईल टॉयलेटची सुविधा व त्याबाबतची स्वच्छता करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. एकाही लाभार्थ्यांची गैरसोय होता कामा नये, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.जिल्हा प्रशासनाने शासन आपल्या दारी या उपक्रमाची तयारी चांगली केली असून कार्यक्रम संपल्यानंतर संबंधित लाभार्थी त्यांच्यासाठी असलेल्या बसेस मध्येच बसून त्यांच्या मुख्यालयी जातील याबाबत सर्व सूचना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रशासनाने वेळेत पोहोचवणे आवश्यक असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तपोवन मैदानावर उभारण्यात आलेल्या पेंडॉल व त्या अंतर्गत निर्माण केलेल्या सोयी सुविधा तसेच या ठिकाणी शासकीय योजनांचे स्टॉल, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा आदींची सविस्तर माहिती घेऊन हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रशासनाने आवश्यक असलेल्या सर्व सूचना पोहोचवलेल्या असून कोणाचीही गैरसोय होणार नाही असे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.