तुकोबांच्या पालखीचे आमदार लांडगेंकडून ‘सारथ्य’- भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत

0 झुंजार झेप न्युज

- वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी भाजपा पुढाकार

पिंपरी चिंचवड, दि.12:  जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी आज शहरात दाखल झाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम…च्या गजराने अवघी उद्योगनगरी दुमदुमून निघाली. भारतीय जनता पार्टी आणि आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी खाऊ वाटप, छत्री वाटप, पाणी बॉटल वाटप, रेनकोट वाटप यासह प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती नितीन लांडगे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, तुकोबारायांच्या पाखलीचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभले. भारतीय जनता पार्टी आणि तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. सर्व भेद अभेद बाजूला सारुन हरीचे नाम प्रेमाने उच्चारावे हीच खरी हरीची सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव केवळ भक्तीभावानेच संतुष्ट होतो म्हणजे हरीनाम घोष चालू आहे तेथेच हा हरी राहात असतो.” याची अनुभूती आली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.