‘प्रधानमंत्री आवास’ लाभार्थींच्या हक्कासाठी आमदार लांडगे मैदानात!

0 झुंजार झेप न्युज

- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना मागणी

- माझ्या समक्ष बैठक घ्या अन्‌ सदनिकांचा ताबा तात्काळ द्या!

पिंपरी चिंचवड,दि.28: ‘‘सर्वांसाठी घरे’’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘प्रधानमंत्री आवास योजना’’ देशभरात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे योजनेबाबत शहरवासीयांमध्ये नकारात्मक संदेश जात आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराचा ताबा तात्काळ द्यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथे प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. प्रशासनाने लाभार्थी निश्चित केले आहेत. त्यांचे कर्ज मंजूर झाले आहे. अनामत रक्कम लाभार्थींनी भरलेली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थींना सदनिकांचा ताबा मिळणे अपेक्षीत होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि काहीअंशी अपूर्ण कामामुळे सदनिकांचा ताबा दिला जात नाही. त्यामुळे लाभार्थींमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर आहे. 

त्यामुळे चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे काम पाहणारे प्रधानमंत्री आवास योजनेचे संबंधित अधिकारी, लाथार्थींचे शिष्टमंडळ यांच्याशी माझ्या समक्ष बैठक घेण्याचे नियोजन करावे. या बैठकीला महापालिकेचा संबंधित जबाबदार अधिकारी उपस्थित असावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. 

प्रतिक्रिया : 

‘प्रधानमंत्री आवास’ योजनेतील संबंधित लाभार्थी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून लाभार्थींना तातडीने सदनिकांचा ताबा देण्याबाबत आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनेबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होवू नये, अशी अपेक्षा आहे. गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या घरांचा ताबा निर्धारित वेळेत मिळावा आणि प्रशासनाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होवू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना केली आहे.- महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.