मोक्यामध्ये सहा महिन्यापासून फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य सूत्रधारास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

0 झुंजार झेप न्युज

भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी 

पुणे,दि.23: भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरनं 119/2023 भा.द.वि कलम 307,320,143,144,147,148,149, आर्म ॲक्ट 4(25),मी पो अ 37 (1) (3) 135, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 31 3(2) 3 (4) या गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी साकिब  मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय 23 वर्ष राहणार लुनिया बिल्डिंग,चौथा मजला, कदम चाळ,संतोष नगर,कात्रज पुणे हा दिनांक 16/02/2023 रोजी पासून मिळत नव्हता टोळीप्रमुख आरोपी साकिब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय 23 वर्षे राहणार लुनिया बिल्डिंग,चौथा मजला,कदम चाळ,संतोष नगर,कात्रज पुणे हा गुन्हा घडल्यापासून फरार कालावधी तो त्याचे अस्तित्व लपवून वारंवार वेगळ्या जिल्ह्यात मध्ये त्याची ओळख व ठाम ठिकाण बदलून वास्तव करीत होता त्याने त्यादरम्यान कात्रज आणि संतोष नगर परिसरात स्वतःची टोळी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. 

सदर आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडे तपास पथकाचे अधिकार व अंमलदार यांनी वारंवार बाहेरील जिल्ह्यामध्ये गुप्त बातमीदाराच्या नेटवर्क सक्रीय करून व तांत्रिक विश्लेषणावरून शोध घेत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत अभिजीत जाधव निलेश ढमढेरे यांना आरोपी साकिब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान हा मु.पो.निरा, ता. पुरंदर, जि. पुणे,येथे राहत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी निरा तालुका ,पुरंदर जिल्हा पुणे येथे जाऊन आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान यांचा शोध घेतला असता.तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी गुन्ह्याची तपास अधिकारी नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले.असून त्यांनी सदर आरोपीस अटक केली आहे आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान हा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी मोका कायद्यान्वय कारवाई करण्यात आली होती त्या गुन्ह्यातून त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता त्याचे साथीदारांनी पुन्हा त्याची टोळी तयार करून त्याने सदरचा गुन्हा केला आहे विशेषता आरोपी साकिब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान हा त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कात्रज भागातील शिक्षण घेणाऱ्या बालकाचा वापर करून त्याच्या टोळीचे कात्रज भागात दहशत निर्माण करत आहे.

सदरील कारवाई मा. प्रवीण कुमार पाटील,अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मा.श्रीमती. स्मार्तरना पाटील, सोमा पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नारायण शिरगावकर सोमा सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन कडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल रसाळे,पोलीस उपनिरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत,अभिजीत जाधव,निलेश ढमढेरे,चेतन गोरे,मंगेश पवार,हर्षल शिंदे, अवधूत जमदाडे,सचिन सरपाल,धनाजी धोत्रे,सचिन गाडे,निलेश खैरमोडे,अभिनय चौधरी,आशिष गायकवाड, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.