सततच्या पावसामुळे ,मका,तूर,बाजरी,भुईमूग, पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
पैठण,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी)दि.25: मा. तहसीलदार यांना दुपारी 1 वाजता पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे.सततच्या पावसामुळे 72 हजार 265 हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका, तूर, बाजरी, भुईमूग, इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तालुका प्रशासनाने या बाधित क्षेत्राचे पंचनामे करून राज्य शासनाकडे 95 कोटी नुकसान भरपाई निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर केला होता तरी अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरपाईची आर्थिक मदत मिळाली नाही
तसेच पैठण तालुक्यातील जवळपास 20 % शेतकरी हे PM किसान योजने पासून वंचित असून ,तहसील कार्यलयातुन कोणतीही माहिती दिली जात नाही,वंचित शेतकऱ्यासाठी मेळावे आयोजित करणयात यावा,त्याचप्रमाणे मागील वर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला असून पीक विम्याचा मोबदला मिळालेला नाही तसेच 5459 शेतकऱ्यांची कांदा अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी या सारख्या मागण्या सदर निवेदनामध्ये करण्यात येणार आहे
तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा न केल्यास शेतकरी यांच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात येणार आहे.याप्रसंगी पैठण चे माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे, पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ गुलदाद पठाण,गोविंद तात्या शिंदे,विलास भैय्या शेळके,विशाल वाघचौरे, कल्याण भुकेले,बब्बू भाई फुलारी,धनंजय इनामे,विष्णुकांत मुंदडा,शेखर देशमुख,आदि जण उपस्थित राहणार आहे
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी हे तहसीलदार पैठण यांना १० दिवसांचा अल्टीमेटम देण्यात येणार आहे.व असे न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात येणार आहे.तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे अशे आहवान पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री डॉ गुलदाद पठाण यांनी केले आहे.

