लोकाभिमुख प्रशासनात अत्याधुनिक साधनाचा वापर महत्वाचा - महासंचालक, प्रज्ञा सरवदे

0 झुंजार झेप न्युज

लोकाभिमुख प्रशासनात अत्याधुनिक साधनाचा वापर महत्वाचा - महासंचालक, प्रज्ञा सरवदे

औरंगाबाद,दि.08: नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान व अत्याधुनिक साधनाचा वापर महत्वापूर्ण असल्याचे प्रतिपादन लोहमार्ग पोलीस विभागाच्या महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी केले.आज लोहमार्ग पोलीस औरंगाबाद जिल्हा कार्यालयासाठी आठ महिंद्रा बोलेरो वाहनाचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रज्ञा सरवदे उपस्थित होत्या. लोहमार्ग पोलिस विभागात रेल्वे प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षा देण्याबरोबरच मदतीच्या वेळी सहकार्य करणे आवश्यक असते. अशा वेळी नवीन वाहनाचा उपयोग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून वाहनासाठी निधी प्राप्त करण्यासाठी राज्यातील इतर लोहमार्ग पोलीस कार्यालयाने देखील विविध साधन सामुग्रीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे सरवदे यांनी सूचित केले. रेल्वे पोलीस विभाग आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकाभिमूख सुविधा देण्यात आहे असे महासंचालक लोहमार्ग पोलीस, श्रीमती प्रज्ञा सरवदे यांनी सांगितले. 

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तांत्रिक साह्य तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याने जिल्हा नियोजन समितीमार्फत एकूण निधीच्या 3 टक्के निधी उपलब्ध करुन दिला. यामुळे गुन्ह्याचा तपास, उकल आणि गुन्हेगारास शिक्षेचे प्रमाण वाढेल. आगामी नियोजनात अत्याधुनिक साधनसामुग्रीसाठी निधीचे प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी लोहमार्ग पोलीस विभागाला सूचित केले. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी लोहमार्ग पोलीस विभागाला आठ वाहनाचे वितरण केले यामुळे रेल्वे प्रशासनाची प्रतिमा व विश्वास वाढेल असे सांगितले.

पोलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले की कुशल नेतृत्वासाठी समन्वय आणि काम करण्याची जिद्द महत्वाची असते. लोकांना अपेक्षित व आवश्यक असणारी सेवा देताना पोलीस विभागांनी लेाक भावनेचा आदर करावा तसेच लोकाशी सकारात्मक संवाद साधून अडी अडचणी जाणून घेतलया पाहिजेत. असे उपस्थित रेल्वे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना संबोधित केले.या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक ग्रामीणचे मनीष कलवानीया लोहमार्ग पोलीस विभागाचे प्रभारी पोलीस अधिक्षक गणेश शिंदे लोहमार्ग पोलीस जिल्हा कार्यालयाअंतर्गत 13 जिल्ह्यातील लोहमार्ग पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.