अक्षय रमेश पाटील गवांदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार
पैठण,दि.18: तुळजापूर सारख्या छोट्याश्या गावातून गरीब परिस्थितीवर मात करत अक्षय पाटील गवांदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.वडील रमेश गवांदे व्यवसायाने शिक्षक,तीन मुली व एक मुलगा असा परिवार,घरची परिस्थिती जेम=तेम परंतु रमेश गवांदे यांनी आपला पूर्ण भार मुलांच्या शिक्षणावर दिला.तीन्ही मुलींना पदवी पर्यंत शिक्षण दिले व मुलाला केमिकल इंजिनियर बनवले.परंतु कंपनीत काम न करता महाराष्ट्र लोकसेवा अयोगाची परिक्षा देण्यावर जोर दिला,आणि आक्षय ने देखील. खुप मेहनत घेऊन आपल्या वडीलांचे सोप्न आज साकार केले.
आक्षय पोलिस उपनिरीक्षक झाल्याबद्दल समस्त गावकरी मंडळीच्या वतीने भव्य मिरवणूक काढुन नागरी सत्कार करण्यात आला.ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.श्री विलास बापू भुमरे साहेब,(भावी आमदार तथा चेअरमन-रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा) हे होते.तर प्रमुख पाहुणे : श्री.लक्ष्मण केंद्रे साहेब, (पोलीस निरीक्षक पैठण)तसेच श्री.उत्तम पवार साहेब(लॉयन अकॅडमी पुणे)श्री.शिवराज भैय्या भुमरे(सरपंच पाचोड)श्री.किशोर पाटील चौधरी(युवा सेना जिल्हाध्यक्ष)सतीष आंधळे (सरपंच,आवडे उंचेगाव)शेख आप्सर संचालक;-रेणुका देवी स.सा.कारखाना)मंचर भोसले (ग्रामविकास अधिकारी नवगांव) शिवराज गायके(ग्रामसेवक आवडे उंचेगाव)साहेबराव दगडखैर(सरपंच नवगाव)संजय थोरात(सरपंच,आगरनांदर) आदर्श मुख्याध्यापक;-श्री.रमेश पाटील गवांदे,हे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन कल्याण सोनवणे यांनी केले,तर शेवटी उपस्थीतांचे आभार प्रदर्शन:-पठाण समशेर यांनी मानले.ह्या वेळी संताराम पा.गोर्डे(केंद्र प्रमुख पैठण नंबर दोन)पंडित भोसले(केंद्रीय मुख्याध्यापक चितेगांंव)अमोल एरंडे(चेअरमन शिक्षक पतसंस्था पैठण)महेश लबडे (सचिव शिक्षक पतसंस्था पैठण)आमोल शेळके (संचालक)शेरु भाई, नवगांवकर,भुकेले,शेंगुळे,येळे,नरके,थोरात,बडे,पटेल,येवले,लजगरे, दगडखैर,पठाण,बेळगे,वाकडे, गवांदे,दुबाले,शेख,इत्यादी.सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,कृषी,सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी व समस्त गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.सर्वांनी अक्षय पाटील गवांदे(पोलीस उपनिरीक्षक)यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

