महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध विकास कामांना उद्योगमंत्री सामंत यांनी दिली मंजुरी

0 झुंजार झेप न्युज

महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध विकास कामांना उद्योगमंत्री सामंत यांनी दिली मंजुरी

अलिबाग,दि.18: महाराष्ट्राचे गतिमान सरकार असून कामगार व ग्रामस्थांसाठी विविध विकास कामे महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात येत आहे असे रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार व ग्रामपंचायती मधील गेली अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामे व समस्या मार्गी लागाव्यात आज महाड उत्पादक संघाच्या सीईटीपीमधील सभागृहात कारखानदार व औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंच यांचे समवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी व्यासपीठावर महाडचे आमदार भरत गोगावले, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, मनोज काळीजकर, संजय कचरे, प्रांताधिकारी डॉ. बानापुरे, डिवायएसपी शंकर काळे, संपर्क प्रमुख विजय सावंत,तालुका प्रमुख सुरेश महाडीक, सिईटीपीचे अध्यक्ष अशोक तलाठी, कारखान्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.मंत्री श्री. सामंत कारखानदार, उद्योजक यांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात येत आहेत, विविध प्रश्नांबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत असे ते म्हणाले.एमआयडीसीच्या राज्यभरातील ३४७ कर्मचार्यांपैकी ३१६ कर्मचार्याना कायम करण्यात आले असून उर्वरित ३१ कर्मचार्यांना कायम सेवेतील कर्मचार्यां प्रमाणेच पॅकेज दिला जाईल. वाढीव एमआयडीसीला विरोध करणार्या ग्रामस्थांना या क्षेत्रात प्रदुषण कंपन्या न आणता ग्रीन झोनमधील कारखाने आणले जातील आणि २० टक्के जागा लघु उद्योजकांसाठी ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले.

ना. उदय सामंत यांनी पुणे येथील रतन टाटा यांच्या कंपनीचे उदाहरण देत या कंपनीत फक्त महिला कर्मचारी असून या १५०० महिला टाटा कंपनीच्या दोन प्रकार च्या गाड्या बनवण्याचे काम ३ शिफ्टमध्ये करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला उद्योजक बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे कारखानदारांनी महिलांना नोकरी देताना अटी व शर्ती ठेवू नये अशा सुचना दिल्या.

सुरुवातीस आ. भरत गोगावले यांनी ग्रामपंचायती व कारखानदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करताना बारसगांव ते आमशेत पर्यायी रस्ता व पुल व्हावा, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण व्हावे, बंद असलेल्या कारखाने, एमआयडीसीच्या सांडपाण्यामुळे ज्या गावांचे पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत त्यांना मोफत पाणीपुरवठा, औद्योगिक क्षेत्रातील आणि आदी मागण्या केल्या.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारून आ. भरतशेठ गोगावले व विकास गोगावले यांनी केलेल्या मागण्या मांडल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.