पिंपरी-चिंचवडमध्ये गोपिचंद पडळकर विरोधात आंदोलन

0 झुंजार झेप न्युज

• गोप्या नावाचं कुत्रं... भुंकतंय...त्याचा बंदोबस्त करा..!

• राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर काटे यांची टीका

पिंपरी चिंचवड,दि.21: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा.श्री.अजितदादा पवार यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केल्याबद्दल विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर याचा जाहीर निषेध करण्यात आला. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रसेच पक्षाचे शहराध्यक्ष श्री. अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा प्रा. कविताताई आल्हाट, युवक सेलसह सर्व सेलचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

‘‘गोप्या नावाचा कुत्रा... काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सोडला आहे. तो कुणावरही आक्षेपार्ह बोलत असतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचे डिपॉडिट जप्त झाले होते. आता त्याला नेत्यांच्या इशाऱ्यावर भूंकल्याशिवाय चालणार नाही. पण, गोप्या जो बोलत आहे. ते त्यांच्या नेत्यांना मान्य आहे का? असा खरा प्रश्न आहे,’’ अशा परखड शब्दांत माझी भूमिका मांडली. राजकीय, सामाजिक जीवनात पडळकरने सभ्यता ठेवावी, अन्यथा आम्ही त्यांचा इतिहास महाराष्ट्रा समोर मांडू... असा इशाराही यानिमित्ताने दिला आहे.

यावेळी माजी नगरसेविका संगिता ताम्हाणे, शमीम पठाण, माया बारणे, माजी नगरसेवक संजय नेवाळे, राजू बनसोडे, मुख्य संघटक अरुण बो-हाडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, शहर प्रवक्ते विनायक रणसुभे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्ना डांगे,ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल,अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ कुरेशी, ज्ञानेश्वर कांबळे, श्रीधर वाल्हेकर, ओबीसी प्रदेश निरीक्षक सचिन औटे,वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला संघटिका मीरा कदम, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, सामाजिक न्याय महिला अध्यक्ष गंगा धेंडे भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, नीलम कदम, लीगल सेल अध्यक्ष संजय दातीर पाटील, शहर उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, शिरीष साठे, प्रदीप गायकवाड, रवींद्र सोनवणे, सचिन वाल्हेकर, रिजवाना सय्यद, अक्षय माछरे, मंजितसिंग, मंगेश बजबळकर, दिनेश पटेल, प्रतिक साळुंके, नितिन सुर्यवंशी, लवकुश यादव, मंगेश असवले, गणेश गायकवाड,निखिल घाडगे, चिन्मय कदम, संकेत जगताप, चेतन फेंगसे,अभिषेक सुर्यवंशी, रोहन शिंदे, प्रज्वल क्षीरसागर, श्रीनिवास बिरादार,सागर ओरसे, अमोल पाटील इत्यादीसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.