राज्य सरकारचा सकल मराठा दिघी ग्रामस्थांच्या वतीने निषेध

0 झुंजार झेप न्युज

राज्य सरकारचा सकल मराठा दिघी ग्रामस्थांच्या वतीने निषेध

पिंपरी,पुणे,दि.03: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे प्रतिनिधी उपोषण करत होते. या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी लाठीमार करीत हवेत गोळीबार केला. या घटनेचा पिंपरी चिंचवड शहरात सर्व प्रथम दिघी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. मराठा समाजाचे शांततापूर्ण सुरू असलेले हे उपोषण पोलीसांनी अमानुष पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध करण्यासाठी दिघी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौकात शनिवारी सकाळी भर पावसातात 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'; 'एक मराठा लाख मराठा'; 'या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय'; मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी संतोष तानाजी वाळके, कृष्णाभाऊ वाळके, सागर रहाणे, निलेश जोगदंड, बापू परांडे,

केशव वाघमारे, गुलाबराव पाटील, अरविंद गोरे, धीरज खांडवे, श्रीमंत गजधने, कैलास तापकीर, संतोष जाधव, कैलास बोरसे, शाम परदेशी, के. के. जगताप, सुनील काकडे, प्रशांत काकेल, किशोर ववले, प्रवीण भोसले, बबन पारधी, हरिभाऊ लबडे, नंदकुमार तळेकर, आबा सुंडके, संदीप सांगुळे, आप्पासाहेब खोत, दत्ता घुले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.