जिल्हास्तरीय दुधभेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाची कारवाई

0 झुंजार झेप न्युज

जिल्हास्तरीय दुधभेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर,दि.10: जिल्हस्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाने कारवाई करुन 12 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले, अशी माहिती जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीच्या वतीने जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती मनिषा हराळ-मोरे यांनी दिली आहे.अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.व्ही.पाटील, अजित मैत्रे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ- मोरे, अन्न सुरक्षा अधिकारी रोडे, जाधववर, तसेच वाळूज पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने लिंबे जळगाव टोलनाका, वाळूज एमआयडीसी येथे बाहेरुन शहरात येणारे दुध व दुग्धजन्य पदार्थ आणणाऱ्या वाहनांची तपासणीकेली. त्यात 12 नमुने घेण्यात आले. त्यात भेसळ तपासणी करण्यात आली. त्यात 9 नमुने हे संशयास्पद व कमी गुणप्रतिचे आढळले. हे नमुने हेल्थ लॅब कडे पाठविण्यात आले आहेत. तसेच वैधमापन विभागामार्फत आवेष्टित वस्तू कायद्याअंतर्गत आवेष्टनावरील उद्घोषणा नियमानुसार नसल्याणे दोन ब्रॅण्डच्या पिशवीबंद दुधाचे नमुने घेऊन जप्तीची कार्यवाही करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुध संकलन शितकरण केंद्र, खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया प्रकल्प यांनी उच्च गुणप्रतिचे भेसळ विरहीत दुध स्विकृती व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह विक्री करावी, त्यासाठी वापरात येणारे वजनकाटे, दुधगुण प्रत तपासणी यंत्रे नियमित व प्रमाणित असावीत,असे आवाहन जिल्हास्तरीय समितीने केले आहे. आगामी नवरात्र व दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात ही मोहिम सातत्याने राबविली जाणार आहे,असेही समितीने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.