अंतरीक्ष केंद्राला शैक्षणिक सहल निवडीसाठी परीक्षेचे अयोजन
छा.संभाजीनगर,दि.04: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.विकास मिना साहेब यांच्या संकल्पनेतून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सलग दुसर्या वर्षी एक आनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.ज्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील तळागाळातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना अंतरीक्ष विषयी सखोल माहिती मिळावी,त्यांची रुची वाढावी, त्यांच्यातून नविन वैज्ञानिक निर्मान व्हावेत यासाठी प्रत्येक केंद्रातील 10 विद्यार्थीं या प्रमाने पैठण तालुका स्तरीय निवड चाचणी परीक्षेसाठी आज जवळपास 176 विद्यार्थ्यांनी तालुकास्तर निवड चाचणीची परिक्षा,जि.प.प्रशाला मुलांची पैठण या केंद्रावर,शिक्षण विस्तार अधिकारी,अनिल पुदाट साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली,कडेकोट बंदोबस्तात सकाळी 10:00 ते 1:00 वेळेच्या दरम्यान एकूण 10 हाॅलमध्ये ही परिक्षा सुरळीत पार पडली.यावेळी परिक्षार्थांचे निरिक्षण करतांना जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,प्रकाश लोखंडे साहेब,प्रशालेचे मुख्याध्यापक, अंकुश गाढे,केंद्र प्रमुख,उत्तम खरात,केंद्र प्रमुख,संताराम गोर्डे, केंद्र प्रमुख,दिलीप थोटे,प्रशालेचे, समशेर पठाण,राजेश पाखरे, राहुल तांदळे इत्यादी.

