पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून बिबट्या पसार...

0 झुंजार झेप न्युज

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून बिबट्या पसार...

पुणे,दि.05: पुण्यातील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून एक बिबट्या पळाला. पळालेल्या बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचं सांगितलं जातंय. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आला. एवढ्या मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने एकच खळबळ उडाल्याचं दिसून येतंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.