कळंब येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करा अन्यथा आंदोलन.

0 झुंजार झेप न्युज

कळंब येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करा अन्यथा आंदोलन.

धाराशिव,कळंब,दि.06(राजेंद्र कळंब तालुका प्रतिनिधी): कळंब येथील बालोद्यान मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा न. प.कार्यालय कळंब यांना निवेदन देवून भीम सैनिकांच्या वतीने देण्यात आला.उद्यानामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वी न.प.प्रशासनाने पुतळ्याभोवती कारंजे, रंग रांगोटी,विद्युत रोषणाई,त्याच प्रमाणे विद्यापीठ गेट प्रमाणे बॅरीगेट करावेत अशी मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.यावेळी कुणाल मस्के,अमर गायकवाड,सतपाल बनसोडे,राहुल हौसालमल,बबलू ढगे,आप्पा सावंत,नितीन अरकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.