खासदार अमोल कोल्हे यांना निगडी प्रभागात प्रचार करू दिला जाणार नाही : सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.24: खासदार अमोल कोल्हे ह्यांना निगडी भागात प्रचार करण्यासाठी विरोध करण्यात येणार असून निगडी येथील सेक्टर 22 जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल प्रकल्प संपूर्ण होऊन १२/१३ वर्ष झाली तरीही पात्र लाभार्थी ९२० नागरिकांना घरकुल प्रकल्प मध्ये घर मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत असून त्या संदर्भात खासदार अमोल कोल्हे ह्यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही किंवा त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना पाठपुरावा केला नाही त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून तसेच निगडी येथील पी सी एम सी कॉलनी येथील जुन्या इमारती धोकादायक झाल्या असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना पी सी एम सी कॉलनी येथील इमारत पुनर्विकास होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला नाही.
किंवा खासदार अमोल कोल्हे ह्यांनी त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना मागणी केली नाही पी सी एम सी कॉलनी ह्या ठिकाणी ९ इमारत असून ६४ घरे एका इमारतीत असून इमारत बांधकाम संपुर्ण होऊन ५० वर्ष संपुर्ण झाली असून इमारत बांधकाम धोकादायक झाले असून त्या मुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे म्हणून खासदार अमोल कोल्हे ह्यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही त्या मुळे निगडी येथील भागात खासदार अमोल कोल्हे ह्यांना निवडणूक प्रचारात येवू दिले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

