जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा

0 झुंजार झेप न्युज

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर,दि.28: लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला.महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, अपर आयुक्त रणजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत नोडल अधिकाऱ्यांच्या सोबविलेल्या जबाबदाऱ्यानुसार कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात आचारसंहिता, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक साहित्य मागणी- वितरण, वाहतुक व्यवस्था, संगणक कक्ष, कम्युनिकेशन प्लॅन, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र, खर्च निरीक्षण, मतपत्रिका, डमी , टपाली मतपत्रिका, मिडिया, संपर्क कक्ष, मतदार यादी कक्ष, मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष, निवडणूक निरीक्षक, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधा (शहरी व ग्रामिण) मतमोजणी, वेबकास्टिंग इ. विविध विषयांनुसार आढावा घेण्यात आला. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.