हवा प्रदूषण करणाऱ्या एमएसएफ व मेस्को जवानांच्या पथक यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड,दि.28: पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्राच्या विविधा भागांतून दररोज ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो- ४०७, आर.एम.सी.प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशी वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकताना मिळून आले बाबत व त्यामुळे हवा प्रदूषण होत असल्या बाबतची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन सापळा रचून या सर्व वाहनचालकांवर दिनांक ०८/०३/२०२४ ते दिनांक २१/०३/२०२४ रोजी पर्यंत कारवाई केली. नदीपात्रात भराव करणारे (१) श्री. शिवा राठोड (वाहन क्र. के.ए.३३/टी.बी.२३२२), (२) बी. उमेश बारणे (वाहन क्र.एम.एच.१४/जे.एल.९०८५), (३). श्री. वेदांत देसाई (वाहन क्र. के.ए.३.३/के.ए.२१०५), (४)
श्री.आर.डी.वाघोले (वाहन क्र.एम.एच.१४/डी.एम.६४३२, एम.एच.१२/टी.एल. ०८७२), (५) श्री.तेजस उक्के (वाहन क्र.एम.एच.२०/सी.आर.२१९१./एम.एच.१४/एल.ए.८३२८), (६) श्री. प्रकाश चौधरी (वाहन क्र. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु. ११४१), (७) बी. कांतीलाल खिरु पवार (वाहन क्र. एम.एच.१४/बी.एम. ९८२) अशी ९ वाहने पकडून र.रु. १.१५,०००/- दंड वसूल करणेत आला आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे, ज्युनियर इंजिनियर स्वप्रिल पाटील, केमिस्ट श्री. पुष्पराज भागवत, यांनी ही कारवाई केली त्यासाठी पर्यावरण पथक प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, तसेच एमएसएफ व मेस्को जवानांचे पथक यांची मदत घेवून कारवाई करणेत आली आहे.
यापूढेही अशा प्रकारे नदी नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हुवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करणेत येईल याची नोंद सबंधितांनी घ्यावी, असे जाहिर आवाहन मनपाच्या पर्यावरण विभागामार्फत करणेत येत आहे.

