बजाज ऑटो कंपनीच्या मदतीने नियोजक संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी STEM संकल्पना करत आहे.
पिंपरी चिंचवड,दि.02: राजरत्न बौद्ध विहार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत से.22 मिलिंद नगर निगडी येथे बजाज ऑटो कंपनीच्या मदतीने योजक संस्था गेली 2 वर्षापासून वस्तीमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी STEM संकल्पनेवर आधारित कार्य करत आहे. त्यामध्ये विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, रोबोटिक्स आणि कोडींग तसेच संगणक यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते. आज दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी राजरत्न बौद्ध विहार येथे योजक संस्थेच्या दैनंदिन अभ्यास वर्गाचे इयत्ता 10 वी व 12 च्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय तसेच त्यामध्ये असणाऱ्या विविध संधी चे मार्गदर्शन तसेच इयत्ता 12 वी सायन्स नंतर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, मेडिकल व इतर विज्ञानाशी संबंधित उच्च शिक्षण घेण्यासाठी संस्थेकडे तसेच इतर शिष्यवृत्ती बाबत मार्गदर्शन श्री. निलेश देसले सर यांनी केले. 10 वी च्या विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी बोर्डाची परीक्षा पास करून विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा किंवा विज्ञानाशी संबंधित इतर शाखांमध्ये प्रवेश करावा. त्याकरिता चांगल्या शिष्यवृत्ती कशा मिळविता येतील यावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार यांनी विद्यार्थ्यांना आगामी असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना परीक्षेला लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल जागरूक करण्याकरिता कौन्सेलर आकांशा गांधी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला मॅनेजर श्री. श्याम वावरे, समन्वयक रोहित माचरे, शिक्षिका अनिता सिंग बैस, स्मिता ढोले, सुमन नमदे, तसेच राजरत्न बौद्ध विहार संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशभाऊ गायकवाड, श्री.सतोष कांबळे कर्नाटक रिपब्लिकन सेना राज्य उपाध्यक्ष सन्मुख हादीमनी शिवशरण हिपरीकर शिवशरण गायकवाड फकिराप्पा आळंद भिमा गवळी शशिकांत कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

