मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु - वाघेरे पाटील

0 झुंजार झेप न्युज

⟩ मराठी नववर्षाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याकडून शुभेच्छा..!

पिंपरी चिंचवड,दि.10: मावळ लोकसभा मतदार संघात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी "मशाल" पेटवून आपल्याला विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु, असे आवाहन करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.लोकसभा निवडणुकांचे वारे देशात आणि राज्यात वाहत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी सर्वांच्या साथीने विजयाची गुढी उभारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

ते‌ म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात परिवर्तन आणि विकासात्मक बदल करायचा आहे. तो बदल करण्यासाठी आपल्या सर्वांची सोबत अतिशय महत्वाची आहे. या लोकसभा निवडणुकीत कोणाच्याही दबावाला आणि भूलथापांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.