हजारो कोकणी बांधवांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार...

0 झुंजार झेप न्युज

• शहरात वास्तव्य करणा-या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या 

पिंपरी चिंचवड,दि.22: हजारो कोकणी बांधवांनी "आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही निष्ठा ठेवून, मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू" अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला.पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्षेत्रात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदीर येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने वधू- वर मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमात शहरातील हजारो मतदारांनी मतदानाची शपथ घेतली.यावेळी नोडल अधिकारी मुकेश कोळप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे,प्रमोद राणे, अँड. चंद्रकांत गायकवाड, अरूण दळवी, परषुराम प्रभू, दिपज्योती सावंत उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ६ हजाराहून अधिक कुटुंबे शहरात वास्तव्य करतात, मतदारांची संख्या २० हजारांच्या जवळपास आहे यामध्ये नवोदीत मतदारांचाही समावेश आहे.

यावेळी सर्वांनी १३ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवोदीत मतदार मनाली पाताडे यांनी मी स्वत: मतदान करणार असुन तुम्हीही मतदान करा असे इतर मतदारांनाही आवाहन केले तसेच भावी वधुवरांंनी देखील लग्नाची तारीख कोणतीही असो, आम्ही सर्वप्रथम मतदान करणार असल्याचे सांगुन इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.