चुकामुक झालेल्या मायलेकींची. 7/8 तासांनी डॉ बच्चूसिंग गुरुमुकसिंग टाक यांनी भेट घालून आणली
पुणे,दि.29: दि. 27/5/2024 रोजी अहमदाबाद येथून हैदराबाद कडे जाणाऱ्या मायलेकींची पुणे रेल्वे स्थानकावर चुकामुक झाली 10 वर्षाची अल्पवयीन मुलगी भेदरलेल्या अवस्थेत रडत गाडीत हडपसर पुणे परिसरात फिरत होती लोक गर्दी करून बघायची भूमिका घेत होते. अशावेळी डॉ बच्चूसिंग गुरुमुकसिंग टाक व मुलगा आझादसिंग टाक त्या लहान मुलीची चौकशी केली ती राजस्थान अहमदाबाद ची रहिवासी असून माझे नाव करीना बटवा आईचे नाव अनिता सुनील बटवा आहे रेल्वे स्टेशनवर माझी आई वडीलांची चुकामुक झाली मुलीची माहिती घेऊन आम्ही हडपसर पोलीस स्टेशनला कळवले हडपसर पोलीस ठाणे अंमलदार मनोज सकट व महिला पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्याने हडपसर रेल्वे स्टेशन येथे जाऊन आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना हडपसर पोलीस स्टेशन येथे घेऊन आणले व त्या लहान मुलीस आई वडिलांच्या स्वाधीन केले.

