आमदार अमित गोरखे यांनी अचानक गरीब लोककलावंताच्या घरी दिली भेट

0 झुंजार झेप न्युज

⟩ गरीब लोककलावंतासाठी विशेष योजना निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणार - आमदार अमित गोरखे 

⟩ आमदार अमित गोरखे यांच्या अचानक भेटीने लोककलाकार नाना कांबळे झाले भावुक 

पुणे, पिंपरी चिंचवड,दि.24: सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व नुकतेच आमदार झालेले अमित गोरखे यांनी निगडी ओटा स्किम झोपडपट्टीतील गरीब लोककलावंत हलगीवादक नाना कांबळे यांच्या घरी अचानक भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .तसेच राज्यसरकारच्या वतीने कलावंतासाठी विशेष योजना सुरु करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी यावेळी आस्वासन दिले .          

यावेळी नाना कांबळे म्हणाले की ,असाच आमदार आम्हाला हवा होता जो गरीब ,वंचित समाजात सहज पोहोचू शकेल काल आमचे हक्काचे आमदार अमित गोरखे माझ्या गरीबाच्या पत्र्याच्या घरात आले भरपूर गप्पा मारल्या चहापाणी घेतले. खोली पावसात गळत होती त्यातही ते येऊन बसले मी आणि माझे कुटुंब धन्य पावलो, आनंद आमचा गगनात मावत नव्हता त्यामुळे मी स्वतःच डफ वाजवून त्यांचं स्वागत केलं, आता त्यांनी माझं कुठलंही काम नाही केलं तरी चालेल ते माझ्या घरी आल्यानंतर माझी समाजातील पत मात्र नक्की वाढली आहे.आमदार अमित गोरखे यांच्या अनोख्या भेटीची शहरभर चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.