अश्विनी जगताप ह्या राष्ट्रवादीत काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) या पक्षात प्रवेश करणार ही बातमी खोटी : सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.18: चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील आमदार अश्विनी ताई जगताप २० नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही न्युज पोर्टल वर बातमी प्रसिद्ध करण्यात आली असून पक्षातील माझी नगरसेवक व पदाधिकारी ह्यांनी जाणूनबुजून मुद्दाम चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी ताई जगताप ह्यांच्या विषयी खोडसाळ पणा केला असून आमदार अश्विनी ताई जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार नाही कै लक्ष्मण भाऊ जगताप ह्यांच्या निधनानंतर आमदार अश्विनी ताई जगताप ह्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिंचवड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती.
त्या वेळी चिंचवड विधानसभा निवडणुकीत आमदार अश्विनी ताई जगताप बहुघोस मतांनी विजयी झाल्या त्या नंतर पक्षातील इच्छुक माझी नगरसेवक ह्यांना चिंचवड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून घराणेशाही सुरू असून त्या संदर्भात खोटा अपप्रचार सुरू असून अश्विनी ताई जगताप व पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांच्या विरोधात खोडसाळ पणा करून पक्षाच्या माझी पदाधिकारी व माझी नगरसेवक ह्यांनी षडयंत्र रचले असून येत्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी जगताप कुटुंबातील उमेदवार बहुघोस मतांनी विजयी होणार असून त्या मुळे विरोधकांनी खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्याचा खटाटोप सुरू केला.
असून त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना लेखी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले असून पक्षातील माझी नगरसेवक व पदाधिकारी ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर

