पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ संचालित

0 झुंजार झेप न्युज

⟩ स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

      

पिंपरी चिंचवड,दि.12: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांच्या वर्गणीतुन थेरगांव येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ संचालित स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन उभारण्यात आले आहे. सदर कामगार भवनाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.         

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाकरीता सद्यस्थितीत जो अफाट खर्च होतो त्यामुळे महागाईच्या काळात कर्मचारी कर्जात बुडून जातो व त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली जाते. यावेळी अनेक छोटे-मोठे समारंभ होत असतात. अशा कर्मचारी वर्गास या कार्यालयाचा उपयोग अत्यंत माफक दरात व्हावा. तसेच कामगारांसाठी बहुउद्देशीय कामगार हिताची कामे व्हावीत हाच कामगार भवन उभारण्यामागील मुख्य उद्देश आहे.

सदर प्रसंगी खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, आण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अति. आयुक्त प्रदिप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचे उपाध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे, पिंपरी चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेचे चेअरमन चारुशिला जोशी व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाबाबतची अधिक माहिती (प्रपत्र - अ व ब) सोबत जोडीत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.