अजित गव्हाणे यांना मुस्लिम संघटनांचा पाठिंबा

0 झुंजार झेप न्युज

 -20 नोव्हेंबर रोजी मतदानाचे आवाहन

भोसरी,दि.10: महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 

भोसरी मतदारसंघांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून अजित गव्हाणे यांनी उल्लेखनीय काम केले आहे. आगामी काळात त्यांच्याकडून या मतदारसंघात सुनियोजित काम होण्याचा विश्वास असल्यामुळे त्यांना हा पाठिंबा जाहीर केला असल्याचे लब्बैक फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी सांगितले.

दरम्यान भोसरी मतदारसंघांमध्ये लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी गव्हाणे यांना दिले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.