'जागृत नागरिक होवू या, अभिमानाने मत देऊ या'

0 झुंजार झेप न्युज

रत्नागिरी विधानसभा मतदार संघ मतदान जनजागृती मॅरेथॉन

ब्रँड अम्बेसिडर म्हणून सर्वांनी काम करावे - जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह  

रत्नागिरी,दि.10: विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान वाढविण्यासाठी सर्वांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी आज मॅरेथॉन काढण्यात आली. पोलीस मैदान येथून सुरु झालेल्या या रॅलीस जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ज्येष्ठ नागरिक अविनाश फडके, प्रातांधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस उपअधिक्षक निलेश माईंनकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही जास्त आहे. परंतु, मतदान कमी होत असते. त्यामुळे सर्वांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करावे आणि मतदार जनजागृती करावी. समाज माध्यमांवर त्याबाबत स्टेटस लावावेत. आपल्या जिल्ह्याचे जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.   

पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे. मतदानाचे हे पवित्र काम आहे. ते सर्वांकडून व्हावे. तरच लोकशाही आणखी बळकट होईल. सर्वांनी आपल्या भागातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवडणुकीचे पवित्र काम करावे.

 सुरुवातीला फलकावर स्वाक्षरी करुन स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी शपथ घेतली. या ठिकाणाहून सुरुवात झालेली मॅरेथान जयस्तंभ मार्गे भाट्ये बीच येथे पोहचली. तेथे सांगता करण्यात आली.    

मॕरेथाॕनमध्ये कोस्टल मॕरेथाॕन फथक, सायकल आसोसिएशन, पोलीस, अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.