"बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे ०१ माऊमर पिस्टल, ०१ जिवंत काडतुस विक्री करण्याकरीता आलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी यांच्याकडुन अटक "
ठाणे,दि.10: दिनांक ०८.११.२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी चे पोशि/१९९७ आमेल इंगळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे नुर मोहम्मद अन्सारी, रा. डोंगरपाडा, गायत्रीनगर, भिवंडी याने त्याचे मुळ गांव उत्तरप्रदेश येथुन अग्निशस्त्र आणली असुन सदर अग्निश्स्त्र हे आपले जवळ बाळगुन तो दिनांक ०८.११.२०२४ रोजी २०.०० वा. रामनगर पाण्याची टाकीजवळ, भिवंडी येथे बसला आहे अशा आशयाची बातमी मिळाल्याने सदर बाबत वपोनि/श्री. जनार्दन सोनवणे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे सपोनि/माळी यांनी प्राप्त माहितीच्या आधारे सापळा कारवाईमध्ये आरोपी नामे नुर मोहम्मद हनिफ अन्सारी, वय २१ वर्षे, रा. गायत्रीनगर, भिवंडी यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे ०१ माऊजर पिस्टल (अग्निशस्त्र) व ०१ जिवंत काडतुस मिळुन आले.
सदर घटनेबाबत आरोपीविरूध्द शांतीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नोंद क्रमांक । १७०१/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम १४२,३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१ गुन्हे श्री. शेखर बागडे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सोनवणे, सपोनि/श्रीराज माळी, पोउपनि/रविंद्र पाटील, सपोउनिरी/सुधाकर चौधरी, पोहवा/प्रकाश पाटील, पोशि/अमोल इंगळे, पोशि/उमेश ठाकुर, पोशि/भावेश घरत, पोशि/सचिन सोनवणे, पोशि/विजय कुंभार, पोशि/नितीन बैसाणे, चापोशि/रविंद्र साळुंके यांनी केली आहे.

