दांडग्या जनसंपर्कामुळे महेश लांडगे विजयाची हॅट्रिक करणार - योगेश बहल यांचा विश्वास

0 झुंजार झेप न्युज

दांडग्या जनसंपर्कामुळे महेश लांडगे विजयाची हॅट्रिक करणार - योगेश बहल यांचा विश्वास

पिंपरी,पुणे,दि.10: आमदार महेश लांडगे यांचा जनसंपर्क वाखाणण्यासारखा आहे. या दांडग्या जनसंपर्काच्या बळावर ते भोसरी मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.   

यावेळी बहल म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात विकासाची गंगा आणली. महायुतीच्या माध्यमातून त्यांना मानणारा वर्ग महेशदादा लांडगे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वतः आमदार लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे ते विजयाची हॅट्रिक करतील. 

अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र आ. लांडगे यांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा करून तो मार्गी लावला. तळवडे भागातील जमिनी विकसित केल्या त्या भागात रस्ते केले. प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.

त्यामुळे शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा मार्ग मोकळा झाला. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार लांडगे यांनी आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून पाणी उचलून पाणीपुरवठा सुरळीत करणारी योजना मार्गी लावली. मोशी भागात यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा ध्यास घेऊन हा प्रकल्प साकारला. आमदार लांडगे हे स्वतः खेळाडू असल्याने कुस्तीसाठी अद्ययावत स्टेडियम केले. विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तसेच महिलांसाठी महायुती सरकारने राबविलेली लाडकी बहिण योजना याचे फायदे संबंधितांना मिळवून देण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्रयत्न केले असे बहल यांनी सांगितले    

सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार लांडगे यांनी प्रचंड जनसंपर्क ठेवला आहे. पाणी, स्वच्छता, आरोग्य, वीज पुरवठा, मनपा व राज्य सरकारच्या विविध योजनांची मदत अशा सर्व प्रश्नांवर लोकांच्या तक्रारी मागवून त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हेल्प लाईन द्वारे

त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला बचत गटांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी सुरू केलेली इंद्रायणी थडी हे सर्वात मोठे प्रदर्शन ठरते. आमदार लांडगे यांचे हे कार्य आहेच. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे. महायुतीचा धर्म पाळून आम्ही मोठ्या मताधिक्याने लांडगे यांना विजय मिळावा यासाठी परिश्रम घेत आहोत. लांडगे हे विजयाचे हॅट्रिक करतील असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.