पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ....

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून सविस्तर आढावा....


पिंपरी चिंचवडदि.29 :  पिंपरी चिंचवड शहराच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात तसेच महानगरपालिकापुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून शहरातील विकास कामांचा वेग वाढविण्याचे आणि प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकासपरिवहनसामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

     पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात राज्याच्या नगरविकासपरिवहनसामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

     बैठकीच्या प्रारंभी महापौर रवि लांडगे यांनी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वागत केलेयावेळी विधान परिषद सदस्य उमा खापरे,अमित गोरखेआमदार महेश लांडगेशंकर जगतापउपमहापौर शर्मिला बाबरस्थायी समिती सभापती अभिषेक बारणेसत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळेविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरमहानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीशहर सुधार समितीचे सभापती संजय काटेनगर सदस्य कुणाल वाव्हळकरधर्मराज तंतरपाळे आदी उपस्थित होते.

     तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगमतृप्ती सांडभोरविक्रांत बगाडेउपसंचालक नगररचना किशोर गोखलेसह आयुक्त मनोज लोणकरमुख्य अभियंता संजय कुलकर्णीआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणेस्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादवसह शहर अभियंता बापू गायकवाडसुनिल भगवानीप्रेरणा सिनकरउप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगलसचिन पवारअण्णा बोदडेसंदीप खोतविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

       या बैठकीच्या सुरुवातीस आयुक्त डाॅ.विजय सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणातून शहरात सुरु असलेले पाणी पुरवठा प्रकल्पअमृत योजना २. ०घनकचरा व्यवस्थापन प्रकल्परस्ते विकास प्रकल्पशहरातील ड्रेनेज व पायाभूत सुविधा सुधार प्रकल्पमेट्रो वाहतूक प्रकल्परस्ते विकास प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनाहुतात्मा क्रांतिवीर चापेकर वाडाअग्निशमन केंद्रनोकरदार महिला वसतिगृहसंतपीठ प्रकल्पमनोरंजन प्रकल्पनदी सुधार प्रकल्पपाणीपुरवठारस्तेस्वच्छता तसेच विविध नागरी प्रकल्पाची माहिती  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना दिली.

      राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्येक प्रकल्पाची सध्यस्थितीकामांचा प्रगतीदरनिधीचे वितरणकामातील तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. शहरातील वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्प आणि मनोरंजन प्रकल्पांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावरही मार्गदर्शन करून सार्वजनिक ठिकाणेउद्याने आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा आढावा घेताना लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्याबाबत काटेकोर नियोजन करावे तसेच रस्ते विकास आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

     यावेळी आमदार महेश लांडगे बोलताना म्हणाले कीशहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या उगम स्थान ते देहू गावापर्यंत एस टी पी लागू करावा अशावेळी महानगरपालिका देखील एसटीपी चा वापरकरून पाणी नदीत सोडेल संपूर्ण इंद्रायणी नदी स्वच्छ होईल. तसेच घरकुल येथील सदनिका प्रकल्प २० वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. तेथे ड्रेनेज लाईन व पाण्याच्या सुविधा उपलब्ध नाहीतत्यामुळे सदनिका धारकांनाचा आतापर्यंतचा कर महानगरपालिकेने माफ करावा तसा ठराव महानगरपालिकेने मंजूर करावा असे देखील आमदार लांडगे म्हणाले.

     आमदार शंकर जगताप म्हणाले कीपिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरातील रेड झोन पॉलिसी कार्यान्वित करावी तसेच शहरांच्या भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पवना नदीतून थेट पाईप लाईनने पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे देखील ते म्हणाले.

     शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहेतपरंतु त्यांना मूलभूत सुविधा योग्य पध्दतीने देण्यात याव्यात असे आमदार अमित गोरखे म्हणाले तर आमदार उमा खापरे यांनी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी केली.

    या बैठकीचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार महापौर रवि लांडगे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.