१८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे

0 झुंजार झेप न्युज

 


मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून महामोर्चाला सुरुवात होणार आहे. तेथून मोर्चा निगडीच्या दिशेने रवाना होऊन निगडी तहसील कार्यालयासमोर त्याची सांगता होणार आहेआरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेऊन त्याचा लाभ अनुसूचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे. महामोर्चात अनुसूचित जातीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला पदाधिकाऱ्यांची उपस्थितीया संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अनिल सौंदडे, ॲड. सुशील मंचरकर (वाल्मिकी समाज ) नेताजी शिंदे, गणेश लोंढे, गणेश अवघडे, भारत विटकर (वडार समाज )मारुती पंदरी(मादिगासमाज )मनोज तोरडमल, मयूर जाधव, संदीप जाधव, चंद्रकांत लोंढे, मारुती जाधव, अविनाश शिंदे, बाबासाहेब रसाळ, बाबासाहेब पाटोळे, अरुण जोगदंड, संजय ससाने, नितीन घोलप, सुनील भिसे, सुरज कांबळे, आशाताई बापू वाघमारे, कृष्णा साबळे, शहाणे भानुदास नेटके, भगवान शिंदे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, शिवाजी साळवे, सतीश भवाळ, अविनाश लोणारी, संजय एडके, राजू आवळे, विठ्ठल झिंजुर्डे, नाना कांबळे, भाऊ कसबे, मारुती सोनटक्के, सागर कापसे, प्रसाद केसरे, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, शंकर खवळे, ऋषी वाघमारे, शिवाजी खडसे, सुरज कांबळे, महादेव आडागळे, योगेश लोंढे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.