फळांनी बहरलेले वृक्ष जसे नम्रतेने झुकतात, त्याप्रमाणे ज्ञान व कर्तृत्व प्राप्त झाल्यानंतरही व्यक्तीने नम्र

0 झुंजार झेप न्युज


 पिंपरी, पुणे (दि. १७ ऑगस्ट २०२६) फळांनी बहरलेले वृक्ष जसे नम्रतेने झुकतात, त्याप्रमाणे ज्ञान व कर्तृत्व प्राप्त झाल्यानंतरही व्यक्तीने नम्र राहिले पाहिजे. यश मिळाल्यानंतर संस्कार, विवेक आणि नम्रता जपावी असे मार्गदर्शन डीआरडीओ चे शास्त्रज्ञ के. व्ही. कोकिळ यांनी केले.

  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये शनिवारी, स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोकिळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जोपासत विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे प्राचार्या डॉ. बिंदू सैनी सांगितले.
   यावेळी उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी,
सुलोचना पवार, दीपक बल्लाल, क्रांती कुलकर्णी, श्रुती दिवटे, धनाजी पाटील, चंद्रकांत ठिंबरे, रमेश नंदाला, अंकित तांबे, श्रीकांत देशपांडे, प्रिया सूर्यवंशी, गौरी उत्तुरे,अजय चावरिया, सुजाता भोईटे, क्रांती कुलकर्णी, ट्रीझा पीटर्स, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. 
विद्यार्थी रुद्रांश भोंडवे, विदिशा ठाकूर, समृद्धी नायक स्वातंत्र्यदिनाचे महत्व सांगितले. 
साक्षरता व व्यसनमुक्त भारत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती गीत सादर केले. 
नवसाक्षरता अभियानांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निर्मला कांबळे, सुनीता घाडगे, अनिता साबणे आणि स्मिता खुराडे यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. सूत्र संचालन जुई भोंडवे, पार्थ कुलकर्णी, अनुष्का पाधियार, तनिष्का नेहरे, यांनी केले. स्वर्णिमा कुलकर्णी हिने आभार मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.