आजचा दिवस कसा जाईल? जाणून घ्या आजचं राशिभविष्य | १८-०१-२०२८

0 झुंजार झेप न्युज

झुंजार झेप  | ज्योतिषशास्त्र

▪  मेष - आज आपण आपल्या प्रियजनांना खूष ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहाल.आपण काही मित्र किंवा नातेवाईक ह्यांच्यावर काहीसे नाराज असाल, मात्र संध्याकाळी एखादी मैफिल ठेवून काही मैत्री संबंध पुनर्प्रस्थापित करण्यास आपण प्रयत्नशील असाल असे गणेशाचे म्हणणे आहे.

▪  वृषभ - आज आपण आपली प्रकृती व आहार ह्याकडे जास्त लक्ष पुरवण्याची शक्यता आहे. आपल्या परिश्रमांना नशिबाची साथ लाभणार नाही. तरीही दिवस अखेरीस आपल्या परिश्रमाने हाती काही लागण्याची शक्यता आहे. जो पर्यंत आपणास याची मधुर फळे चाखावयास मिळत नाहीत तो पर्यंत प्रयत्नशील राहा, असा गणेशा सल्ला देत आहे.

▪  मिथुन - आपल्या एखाद्या प्रिय व्यक्ती समोर आपल्या भावना व्यक्त करण्यास पुढाकार घेऊन त्या व्यक्ती कडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा बाळगू शकाल. आपल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचा स्वीकार केला जाईल. आजचा दिवस आनंददायी व शुभ असल्याचे गणेशा सांगत आहे.

▪  कर्क - इतरांना मदत करून आपण आनंद मिळवाल असे गणेशस वाटते. आपण इतरांना धीर देऊन प्रोत्साहित कराल. प्रियव्यक्तीशी जवळीक साधून आपण आनंदित व्हाल. आपण एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित व्हाल व त्याचा आपणास फायदा होऊ शकेल.

सिंह - त्यामुळे आपणास त्यांची जवळीक जाणवेल. नेहमी प्रमाणेच इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल. आज जर आपण सुस्थितीत असल्याचे आपणास जाणवले तर एखाद्या व्यक्तीला आपण मार्गदर्शन कराल. एखाद्याच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकाल व त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा सुद्धा मिळवू शकाल, असे गणेशा सांगत आहे.

कन्या - आज कामाचा व यशाचा उपभोग घेण्यास खूप प्राधान्य असल्याचे गणेशा सांगत आहे. कामाप्रती असलेल्या आपल्या निष्ठेची योग्य प्रमाणात प्रशंसा होईल व आपण जे काही काम कराल त्यात यशस्वी होण्याची आपली ईच्छा पूर्णत्वास जाईल. आज प्रलंबित असलेली पदोन्नती होण्याची व मागील थकबाकी मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे

तूळ - कामाच्या ठिकाणी जोडा व पुढे व्हा हे धोरण आज ठेवा. ह्या दोन्ही गोष्टी आज आपण कामाच्या ठिकाणी करून दाखवाल, मग त्यात दूर ध्वनी वरील व्यावसायिक बोलणी, किंवा लेखी स्वरूपातील व्यवहार किंवा बैठकीतील बोलणी ह्यांचा समावेश असू शकतो. आज लोकांना सामोरे जाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. परंतु कामा व्यतिरिक्त संध्याकाळ आपल्या जोडीदारासह शांत पणे घालवा. दोघांनी बरोबर एखादा चित्रपट पहा असा सल्ला गणेशा देत आहे.

▪  वृश्चिक - नाते संबंध संभाळताना आपल्या मोजमापात काही नव्याची भर घालण्याचा सल्ला गणेशा देत आहे. जवळच्या नाते संबंधातील गुंता युक्तिपूर्वक दूर करू शकाल. नाते संबंधात दुरावा निर्माण होणार नाही ह्याची दक्षता घेण्याचा इशारा गणेशा देत आहे.

▪  धनु - आजचे आपले ग्रहमान बलाढ्य असून आजचा दिवस आपल्यासाठी सुखद बनविण्याची योजना ते आखत असल्याचे गणेशा सांगत आहे. आपण एक परिपूर्ण व्यावसायिक असून त्यासाठी आपण कौतुकास पात्र आहात. कामाच्या ठिकाणी उदभवणाऱ्या सर्व समस्यांना सामोरे जाण्याचे कसब सुद्धा आपल्यात आहे. ह्या वृत्तीमुळे लोकांची मने जिंकून आपल्या मित्रांच्या यादीत काही नावांची भर आपण नक्कीच घालू शकाल.

▪  मकर - साधारणतः एखाद्याला यश मिळाल्यावर इतरांना विशेषतः सहकाऱ्यांना त्यांचा हेवा वाटत असतो, परंतु आपल्या बाबतीत तसे नाही. आपण जेव्हा नवीन प्रकल्प किंवा काम हाती घ्याल तेव्हा आपले सहकारी आपणास निव्वळ प्रेरित करणार नाहीत तर मार्गदर्शन सुद्धा करतील. नशिबानेच एखाद्याला सहकार्य करणारे सहकारी मिळत असतात, असे गणेशाचे सांगणे आहे. आपल्यापैकी जे सध्याच्या नोकरीत बदल करू इच्छितात त्यांनी आजचा दिवस अनुकूल नसल्याने थोडे थांबावे.

▪  कुंभ - शेवटी आपल्या आजच्या दिवसाची सांगता आपल्या कठोर परिश्रमाच्या यशस्वी फळांचा आनंद घेऊन होईल. प्रत्येक परिस्थितीजन्य प्रकल्पांचा सारासार विचार, नियोजनांचे कागदावरील रेखाटन व जवाबदाऱ्यांचे वाटप आपण उत्तम रित्या करता. मात्र, ह्या योजनांची अंमल बजावणी करणे आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. व्यवहारीपणा राखल्यास यशाची हमी गणेशा देत आहे.

▪  मीन - आपले नित्यक्रम पूर्ण करण्यासाठी आपण खूप परिश्रम घेता, परंतु आजचे ग्रहमान प्रतिकूल असल्याने आपण त्यात यशस्वी होऊ शकणार नाही. थोडा धीर धरा व गोष्टी जशा घडत आहेत त्या तशाच घडू द्या, मात्र आपल्या भावना न बदलण्याचा सल्ला गणेशा देत आहे. आपणास जरी गोष्टी सोडून द्याव्या लागल्या तरी आपला हक्क सोडावा लागणार नाही ह्याची काळजी घ्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.