प्रतिनिधी :
मुंबई : ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
एखाद्या राजकीय पक्षानं शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करू, असं म्हटलं असेल तर त्यांची आंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
जाहिरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख करायला हवा होता की तुमच्या पीककर्जालाच माफी देऊ. तुम्ही शेतीच्या जोडधंद्याला जे कर्ज घ्याल त्याला आम्ही माफी देणार नाही, असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं असतं तर लोकांनी देखील आधी ठरवलं असतं की कोणाच्या बाजूने जायचं, असं खोत म्हणाले.
दरम्यान, मी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे की जे पक्ष जाहिरनाम्यात छापतात आणि निवडून आल्यावर त्याची आंमलबजावणी करत नाही अशा पक्षांची नोंदणाी रद्द केली पाहिजे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

