प्रतिनिधी :
बीड : जवळपास सात लाख शेतकऱ्यांचे विमा वाटप थकलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे सामाजिक न्याय मंंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीेने मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे 2018चा थकीत पीकविमा वाटपास सुरूवात केली आहे. तर 90 हजार नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत 27 तारखेपर्यंत लेखी याद्या देण्याचे आदेशही धनंजय मुंडे यांनी दिेले.
मागील सरकारमध्ये झालेल्या कारभारावर ताशेरे ओढताना भाजपच्याच आमदारांच्या तोंडून प्रि-फॅब्रिकेटेड अंगणवाड्याचा जवळपास 24 कोटी आखर्चित निधी परत गेला असल्याचं बैठकीत उघड झाल्याचं मुंडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बैठक सुरू असताना आमदार सुरेश धस आणि आमदार प्राकाश सोळुंके यांच्यात वाद झाला. धस बोलत असताना सोळुंकेंनी मध्येच त्यांना थांबवल्याने धस चांगलेच संतापले. त्यानंतर मुंडेंनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.

