मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. नाडकर्णी यांचे जावई विजय खरे यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. बापू यांचे पूर्ण नाव रमेश गंगाराम नाडकर्णी असे होते. मात्र त्यांना बापू नाडकर्णी या नावाने ओळखलं जातं. बापू यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बापू नाडकर्णी यांची गोलंदाजांच्या शैलीमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती. नाडकर्णी हे डावखुरी गोलंदाजी करत असत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वात कमी धावा करणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी यांची ओळख होती. कसोटीमध्ये क्रिकेटमध्ये सलग 21 षटक मेडन टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावे आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यामध्ये बापू नाडकर्णी यांनी 32 ओवर टाकल्या होत्या. यामध्ये 21 षटक या मेडन ओवर होत्या. महत्त्वाचं म्हणजे 32 षटकांमध्ये त्यांनी केवळ पाच धावा दिल्या होत्या.
Very sad to hear about the demise of Shri Bapu Nadkarni. I grew up hearing about the record of him bowling 21 consecutive maiden overs in a Test. My condolences to his family and dear ones.
Rest in Peace Sir.
1,828 people are talking about this
राज ठाकरेंनी ट्विट करत नाडकर्णी यांना अभिवादन केले आहे.
५६ वर्षांपूर्वी ह्याच जानेवारी महिन्यात बापू नाडकर्णींनी सलग २१ षटक गोलंदाजी करत एकही धाव समोरील संघाला न देता विश्वविक्रम रचला होता. अशा एका ज्येष्ठ क्रिकेटपटूच निधन झालं. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
202 people are talking about this



.