2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन | झुंजार झेप न्यूज

0 झुंजार झेप न्युज

मुंबई प्रतिनिधी :
मुंबई: राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामागील राजकारण संपूर्ण देशाला ज्ञात आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाविरोधी सर्व पक्षांची मोट बांधणी करून २०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती करण्याचे प्रयत्न राऊत यांनी सुरू केले आहेत. संजय राऊत यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र करून २०२२ पर्यंत राष्ट्रपती हा भाजपशिवाय होईल असा दावा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात शरद पवार आणि संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी राऊत यांनी अनेकदा पवारांची भेट घेतली होती. आता राऊत देशातील भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करणार आहेत. २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतरचे राष्ट्रपती पवार व्हावेत, यासाठी राऊत यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.